मुंबई: राज्य सरकारने राज्यातील लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न सुरू केला असून लसीकरणासाठी स्वतंत्र अॅप विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी महत्वाची मागणी यांनी केंद्र सरकारला केली आहे. केंद्र सरकारने विकसित केलेले कोविन हे अॅप सुरळीत चालत नसल्याने लसीकरणात अडथळे निर्माण होत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारचे स्वत:चे अॅप विकसित करण्याची परवानगी मागितली आहे. (Chief Minister Uddhav Thackeray has asked the Center to allow the development of a separate app for vaccination)

एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी नुकताच संवाद साधला होता. त्यावेळी देखील त्यांनी व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार केली होती. कोविन हे अॅप व्यवस्थित काम करत नसल्याने लशीच्या लाभार्थ्यांना वेळेत लस घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे लसीकरणाच्या मोहिमेत विस्कळीतपणा देखील येत आहे. राज्य सरकारचे स्वत:चे अॅप विकसित झाल्यास त्याचा वापर राज्यातील जनतेकडून मर्यादित स्वरुपात होईल. यामुळे लसीकरणाची मोहीम देखील सुरळीत चालेल अशी अपेक्षा आहे.

राज्यात कडक निर्बंध लागू होऊन जवळजवळ महिना झाला असून परिणामी राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील मुंबई महानगर प्रदेशातील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. या मुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात करोनाची रुग्णसंख्या आणखी कमी होईल अशी शक्यता दिसत आहे.

क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, मे १६ पर्यंत राज्यातील एकूण ११ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्या घटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात करोना रुग्णसंख्येत या दरम्यान १३ टक्क्यांची वाढ नोंदली गेली असून, आकडा ६.९ लाखांवरून ७.२ लाखांवर पोहोचला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
राज्यात रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास राज्यातील एकूण २२ जिल्ह्यांमध्ये खाटांची कमतरता भासेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवण्याची शक्यता आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात सुमारे ३० हजार खाटांची कमतरता भासेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here