मुंबई: यांनी फोनद्वारे राज्याचे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत राज्यातील करोनाच्या स्थितीची माहिती घेतली. यावेळी कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र चांगले प्रयत्न करत असल्याचे म्हणत राज्याचे कौतुक केले. महाराष्ट्र करोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना चांगली लढाई लढत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. (pm modi praised maharashtra in telephonic dialogue with )

मुख्यमंत्र्यांनी मांडला ऑक्सिजनचा मुद्दा

करोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना वेळोवेळी उपयुक्त सूचना केलेल्या होत्या. त्या सूचना स्वीकारल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरील संभाषणादरम्यान आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ऑक्सिजनच्या आवश्यकतेचा मुद्दा पंतप्रधांनापुढे उपस्थित केला. राज्याला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली त्यांनी पंतप्रधानांना केली.

याबरोबर महाराष्ट्र ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी काय करत आहे याची माहिती देत मुख्यमंत्र्यांनी विविध उपाययोजनांबाबतही सांगितले. माहिती दिली. राज्याने करोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली असून त्यासाठी कसे नियोजन सुरू आहे याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी पत्रप्रधानांना दिली. यात बेड, रेमडेसिवीर आणि इतर औषधे, तसेच ऑक्सिजनची उपलब्धता हे महत्वाचे मुद्दे आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

राज्याचे स्वतंत्र अॅप विकसित करण्याची मागितली परवानगी

केंद्र सरकारने विकसित केलेले कोविन हे अॅप सुरळीत चालत नसल्याने लसीकरणात अडथळे निर्माण होत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारचे स्वत:चे अॅप विकसित करण्याची परवानगी मागितली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here