म. टा. प्रतिनिधी, नगरः ‘करोना प्रतिबंधक लशीचे उत्पादन करण्यास मर्यादा आहे. पुण्यातील सिरम इस्टट्युटचे मालक आदर पुनावाला ब्रिटनमध्ये जाऊन जे बोलले ते खरच बोलले. १३५ कोटी लोकसंख्येच्या देशासाठी एका रात्रीतून लस उत्पादिक करणे शक्य नाही,’ अशा शब्दात महसूल मंत्री यांनी पुनावाला यांची पाठराखण केली आहे. संगमनेर तालुक्यात लसीकरणासाठी पुढाकार घेणारे अंगवाडी सेविका ते डॉक्टर अशा घटकांचा थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी थोरात बोलत होते. लसीकरणासंबंधी मार्गदर्शन करताना टंचाईवरही त्यांनी भाष्य केले. त्यावेळी पुनावाला यांच्या विधानांबद्दलही त्यांनी मत व्यक्त केले.

‘आम्हाला लस पाहिजे म्हणून सगळे जण पुनावाला यांना दमच देत सुटले. मात्र, ब्रिटनमध्ये जाऊन ते जे बोलले ते खरेच बोलले. एवढ्या मोठ्या देशासाठी एक रात्रीतून लस बनविता येऊ शकत नाहीत. त्यांचे हे म्हणणे खरेच आहे. पुनावाला हे काही राजकारणी नाहीत. शिवाय ते जे काही सांगत आहेत, त्यात तथ्य आहे. त्यामुळे उत्पादनातील मर्यादा लक्षात घेऊन आपण लसीकरणाचे नियोजन केले पाहिजे. जेवढा कोटा मिळत आहे, त्याचे काळजीपूर्वक नियोजन केले पाहिजे. राज्याला जास्त कोटा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करीत आहोत, असं थोरात यांनी म्हटलं आहे.

‘परदेशातील काही लशीही आपल्याला उपलब्ध होणार आहेत. दोन-तीन महिन्यात भरपूर प्रमाणात लस यायला सुरवात होईल. सध्या तरी जेवढी मिळत आहे, त्याचे योग्य वाटप आणि नियोजन झाले पाहिजे. लसीकरणासाठी गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या राज्यात आरोग्यसेविका आणि आरोग्य क्षेत्रातील शेवटचे घटक चांगले काम करीत आहेत. राज्यपातळीवर मुख्यमंत्री, मंत्री निर्णय घेत असतात, तरी खऱ्या अर्थाने हे काम आरोग्य क्षेत्रातील या खालच्या घटकाच्या हातात आहे. आतापर्यंत ज्या धडाडीने काम केले, ते तसेच सुरू ठेवा. संकट अद्याप ठळलेले नाही. मधल्या काळातील गहाळपणाच आपल्याला नडला. त्यामुळेच दुसरी गंभीर लाट आज पहायला मिळत आहे. पुढील काही महिने तरी आपण असेच काम सुरू ठेवू. दिवाळी चांगली गेली पाहिजे, असे लक्ष्य ठेवून काम करण्याची गरज आहे,’ असेही थोरात म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here