बुलडाणा: सध्या देश व जग कोरोना संसर्गाच्या संकटात आहे. अशा परिस्थितीत कडक उन्हात पवित्र महीना सुरु आहे. कोरोना महामारीने जगातील जनता त्रस्त झाली आहे. जग व भारत देश कोरोनामुक्त व्हावे अशी प्रार्थना अल्लाकडे करत बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील ९ वर्षाच्या अबीरा फहिम देशमुख या चिमुकलीने रमजान महीन्याचे सर्व (उपवास) ठेवले आहेत. या कडक उपवासात देशात व जगात पहील्यासारखे जनजीवन सुरू व्हावे, कोरोनाबाधितांची प्रकृती बरी व्हावी, देश या कोरोना संकटातून बाहेर पडावा अशी विशेष प्रार्थना अल्लाहकडे दररोज ही चिमुकली रोजा इफ्तार करतांना कुटुंबियांसोबत करत आहे. (a 9 year old girl kept a full fast to free the country from )
शेगाव येथील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अबीरा देशमुख हिने सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात रोजाच्या नियमांनुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली. अबीरा हिने ठेवलेले महिन्याभराचे रोजे थक्क करणारे ठरत आहेत. भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाहकडे दुवाच्या माध्यमातून अबीरा हि चिमुकली दररोज साकडे घालते.
क्लिक करा आणि वाचा-
आताच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या हाल अपेष्ठा पाहून रुग्णांची सेवा करण्यासाठी अबीराने आपल्याला डॉक्टर च व्हायच हे निश्चित केलंय… अबीराची ही प्रार्थना आणि तिचे स्वप्न अल्लाहकडून पूर्ण होवोत हीच तिला शुभेच्छा.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times