रत्नागिरी: जिल्ह्यात संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असतानाच या संकटाच्या काळात आणि राणे कुटुंब आपसातील शत्रुत्व बाजूला सारून एकदिलाने व एकमताने काम करताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ९ मे रात्री १२ वाजल्यापासून कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून यानिमित्ताने ही दिलजमाई पाहायला मिळाली आहे. ( Shiv Sena Minister )

वाचा:

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जिल्ह्यात काही भागांत करोना विषाणूचा समूह संसर्ग होत असल्याचे आढळून आल्याने व तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेतले. यावेळी माजी मुख्यमंत्री व जिल्ह्यातील प्रमुख नेते तथा भाजप खासदार यांनी जो पाठिंबा दिला त्याची सामंत यांनी मुक्तकंठाने स्तुती केली.

वाचा:

नारायण राणे हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना त्यांचे चांगले सहकार्य मला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व समूह संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावावे लागणार आहेत, असे मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ असे निर्बंध आवश्यक असल्याचे मला सांगितले. अशा विधायक आणि जनतेच्या हितासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांत मी नेहमीच आपल्या पाठिशी असेन, असे त्यांनी सांगितल्याचे नमूद करत सामंत यांनी राणे यांची स्तुती केली. यामुळे कोविड संकटाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि राणे कुटुंबातील तणाव तूर्त निवळल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रत्नागिरीतही लॉकडाऊन लावणार

सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसांत पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होणार आहे, असे सामंत यांनी नमूद केले. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्याची नाही, असे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. उलट ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्राने पुरेसा लसपुरवठा करावा म्हणजे लसीकरणाचा वेग वाढवता येईल, असे माझे म्हणणे असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

169 COMMENTS

  1. can you purchase prednisone for dogs without a prescription [url=https://prednisone24.top/]prednisone 20mg by mail order[/url] generic prednisone

  2. can i buy cheap pregabalin price [url=https://pregabalin2023.top/]buy pregabalin without rx[/url] where can i get cheap pregabalin tablets

  3. get cheap lyrica no prescription [url=https://lyrica24.top/]can i buy cheap lyrica pill[/url] generic lyrica without a prescription

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here