नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रशिक्षक प्रशिक्षक माइक हसी हे आता करोना निगेटीव्ह झाले आहेत. पण करोन निगेटीव्ह झाल्यावरही हसी यांना काही गोष्ट करणे बंधनकारक असेल.

चेन्नईच्या संघातील गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांना करोना झाल्याचे समजले होते, त्यानंतर हसी यांनाही करोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते. त्यामुळे बालाजी आणि हसी यांना दिल्लीवरून चेन्नईला उपचारासाठी नेण्यात आले होते. चेन्नईतील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि आता त्यांचा करोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

हसी करोना निगेटीव्ह आले असले तरी त्यांना भारतामध्येच राहावे लागणार आहे. कारण त्यांना आता काही दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांच्या मायदेशी पाठवण्याची तयारी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हसी काही दिवस भारतात क्वारंटाइन राहतील. कदाचित त्यांना चेन्नईमध्येच ठेवण्यात येणार आहे.

हसी हे बालाजी यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना करोनाची लागण झाल्याचे म्हटले जात आहे. कारण हे दोघेही प्रशिक्षक होते. त्यामुळे त्यांच्या बैठका होत होत्या. त्यामुळे बालाजी यांच्यामार्फत त्यांना करोना झाल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी बालाजी हे करोना निगेटीव्ह सापडले होते. त्यानंतर आता हसीदेखील करोना निगेटीव्ह झाले आहेत. त्यामुळे चेन्नईच्या संघासाठी ही आनंदाची बातमी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here