मुंबईः मुंबईतील करोनाच्या चाचण्या व कोविड मृतांच्या आकेडेवारींवरुन विरोधीपक्ष नेते यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. तसंच, करोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, असंही म्हटलं आहे. या पत्रावरुन काँग्रेसचे प्रवक्ते यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

करोनाच्या या दुसर्‍या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने होतो आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या आरोपांवर सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे. ‘मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयाने केली याचा फडणवीसांना खरंतर आनंद वाटायला हवा होता. पण त्यांची पोटदुखी व्हावी ही अपेक्षा नव्हती,’ असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

‘खोट्या आकडेवारीचा मसीहा असलेल्या भाजपचे सर्व मुख्यमंत्री आपल्या राज्यांमध्ये आकडे दडवतात व फडणवीस इथे चिंता व्यक्त करतात हे आश्चर्याचं आहे,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.

‘दुसरी लाट सुरु झाली तेव्हा १० फेब्रुवारीला मुंबईत ३. १३ लाख रुग्ण व ११, ४०० मृत्यू होते. आज ६. ७१ लाख रुग्ण व १३, ६८७ मृत्यू आहेत. दुसऱ्या लाटेचे ३ महिन्यात २,२८७ मृत्यू आहेत. हा दर केवळ ०.७ टक्के आहे जो जगात कमी आहे. दिल्लीत आठवड्याला ३००० मृत्यू होत आहेत,’ असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

‘करोना व्यतिरिक्त मृत्यू करोना मृत्यूशी जोडले तरी हा दर ०.८ टक्के फारतर होईल. तो ही जगात कमी आहे. मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. अस्लम शेख व वर्षा गायकवाडही महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर मेहनत घेत आहेत. भाजपने पोटदुखीचा इलाज करावा व भाजपशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडे लक्ष द्यावे,’ अशी खोचक टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here