नवी दिल्ली : आयपीएलचे उर्वरीत ३१ सामने आता कुठे होणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. पण या या निसर्गरम्य बेटावर आयपीएलचे यावर्षीचे सामने होऊ शकतात. कारण या देशाने आता आयपीएलचे सामने भरवण्यासाठी उत्सुकता दाखवल्याचे समजते आहे.

गेल्यावर्षी करोनामुळे भारतात आयपीएलचे सामने होऊ शकले नाहीत. त्यावेळी़ही श्रीलंकेने बीसीसीआयपुढे आयपीएलचे सामने खेळवण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे म्हटले जात होते. आता यावर्षीही श्रीलंकेच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू अर्जुन डीसिल्व्हा यांनी आयपीएलचे उर्वरीत सामने सप्टेंबरमध्ये खेळवण्याची इच्छा जाहीर केली आहे. त्यामुळे आयपीएलचे उर्वरीत सामने खेळवण्यासाठी आता बीसीसीआयपुढे श्रीलंकेचाही पर्याय असणार आहे. श्रीलंका भारताच्या जवळ असून तिथे करोनाचे प्रमाणही कमी आहे.

आयपीएलचे उर्वरीत सामने इंग्लंडमध्ये होऊ शकतात, असे काही दिवसांपूर्वी म्हटले जात होते. कारण इंग्लंडमधील कौंटी खेळणाऱ्या संघांनी आपल्या क्रिकेट मंडळाला आयपीएलचे सामने आयोजित करण्याबाबत पत्र लिहीले होते. कारम सप्टेंबरमध्ये भारताचा संघ इंग्लंडमध्येच आहे. त्यामुळे तिथेच हे सामने खेळवण्यासाठी प्राधान्य दिले जाऊ शकते. कारण यावेळी भारताच्या खेळाडूंना तरी क्वारंटाइन व्हावे लागणार नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी इंग्लंड हा आयपीएलच्या सामन्यांसाठी चांगला पर्याय दिसत आहे.

गेल्यावर्षी आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आली होती. युएईमधील आयपीएल ही यशस्वी झाली होती. त्यामुळे यावर्षी आयपीएल भारतामध्ये आयोजित करण्याचे ठरवण्यात आले होते. पण यावेळी करोनामुळे भारतामधील आयपीएल २९ सामन्यांनंतरच स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता आयीएलमधील उर्वरीत ३१ सामने कधी आणि कोणत्या देशात खेळवले जाणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. सध्याच्या घडीला तरी भारतापुढे तीन पर्याय आहे. पण बीसीसीआयला यावेळी इंग्लंडमधील कसोटी मालिका आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक यांच्यामधील काळात आयपीएल खेळवावी लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला यावेळी सर्वच गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागणार आहे. पण बीसीसीआय आयीएलच्या उर्वरीत सामन्यांसाठी आता कोणत्या देशाची निवड करणार, याची उत्सुकताही त्यांच्या चाहत्यांना नक्कीच लागलेली असणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here