कोल्हापूर: कायदा अमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पूर्व परीक्षा, मुलाखत, परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. तरीही महाराष्ट्रातील जवळपास २१८५ उमेदवारांची काहीही चूक नसताना त्यांना नियुक्तीपत्र दिले नाही, असे नमूद करत त्यांना तातडीने नियुक्ती पत्र देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. ( )

वाचा:

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून त्यांचे राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने दिलेल्या अंतिम निकालामध्ये ९ सप्टेंबर २०२० पूर्वी पूर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया या अबाधित राहतील असा स्पष्ट उल्लेख आहे, असे नमूद करत पाटील यांनी त्याअनुषंगाने आपली मागणी पत्रात मांडली आहे.

वाचा:

सध्या , करोना संकट, बेरोजगारी अशा परीस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करून कष्टातून यश मिळवून देखील त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. पात्र उमेदवारांना आपल्या भविष्याची चिंता असून या नियुक्तीबाबत त्यांच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे त्यांना नियुक्तीपत्र देणे आवश्यक आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. हे युवक उच्चशिक्षित असूनदेखील बेरोजगार असण्याची एक प्रकारची नकारात्मक भावना त्यांच्यात वाढत असून शेतकरी आत्महत्येनंतर आता सुशिक्षित बेरोजगार म्हणून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची त्यांची मनस्थिती बनत चालली आहे. विविध विद्यार्थी मराठा संघटना याबाबत निवेदन सादर करीत आहेत. म्हणून मुख्यमंत्री या नात्याने आपण २१८५ उमेदवारांच्या नियुक्तीबाबत गांभीर्यपूर्ण विचार करून उमेदवारांना नियुक्ती पत्र लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती पाटील यांनी पत्रात केली आहे.

दरम्यान, खासदार यांनीही या उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्र देण्याची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here