नागपूर: नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने मुली व तरुणींचे अपहरण करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा येथील पोलिसांनी पर्दाफाश केला. येथून पोलिसांनी २२ वर्षीय तरुणीची सुटका करून पोलिसांनी कुख्यात घरफोड्यासह चौघांना अटक केली आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे. ( )

वाचा:

कुणाल अरुण ढेपे (वय ३७, रा. गणेशनगर,), विभा अनिल वरदेकर (वय ४०, गल्ली नंबर दोन, महाल), मुस्कान मोहबुद्दीन शेख (वय ३१, नवीन फुटाळा) आणि (वय २४, खापतखेडी, उज्जैन-मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कुणाल हा कुख्यात घरफोड्या असून त्याच्याविरुद्ध आठ गुन्हे दाखल आहेत. भरत हा शेती करतो.

वाचा:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बेलतरोडी परिसरात राहते. ती कॅटरिंगच्या कामाला जायची. कुणाल याने तरुणीसोबत ओळख वाढविली. तिला चांगली नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. विभा व मुस्कान या दोघींनीही कुणाल हा नोकरी लावून देतो, असे सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला. १९ एप्रिलला तिघे तिला घेऊन उज्जैन येथे गेले. तिथे भरत याला एक लाख ७० रुपयांमध्ये तरुणीला विकले. त्यानंतर तिघे परत आले. भरत याने बळजबरीने तिच्याशी लग्न केले. दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या आईने बेलतरोडी पोलिसांत तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

वाचा:

पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय आकोत यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया, हेड कॉन्स्टेबल शैलेश बडोदेकर, बजरंग जुनघरे, गोपाल देशमुख यांच्या पथकाने तरुणीचा शोध सुरू केला असता तरुणी उज्जैन येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तेथे पोहचले व तरुणीची सुटका करून भरत याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुणालसह तिघांना अटक केली आहे. या टोळीने आणखी असे गुन्हे केले आहेत क, याचा तपासही पोलीस करीत आहेत. चौघांनाही रविवारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात येईल.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here