: नगरपरिषदेचा कारभार आता प्रशासकाच्या हाती राहणार आहे. लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ ८ मे रोजी पूर्ण झाला. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालय विभाग यांच्या आदेशानुसार मोहोळ नगर परिषदेच्या प्रशासकपदी संबंधित उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. ( )

वाचा:

मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या व त्याबाबतच्या हरकतीही मागवण्यात आल्या होत्या. मात्र आता प्रशासक नियुक्त झाल्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम पुढे जाणार आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ ८ मे रोजी संपला आहे. प्रशासनाने नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग उमेदवार आरक्षण व मतदार याद्या प्रसिद्धी करणे व त्याबाबतच्या हरकतींचा कार्यक्रम ३० एप्रिल पर्यंत पूर्ण केला होता. मात्र संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त डॉ. यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मोहोळ नगर परिषदेच्या प्रशासकपदी संबंधित उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. नगरपरिषदेची मुदत संपताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने सुरू असलेल्या उमेदवारांच्या चाचपणी व पक्षांतर्गत हालचालींना काही महिन्यांसाठी का असेना विराम मिळाला आहे.

वाचा:

दरम्यान, नगरसेवकांचे अधिकार आता संपुष्टात आल्याने विकासकामांची गती कमी होणार आहे. तथापि ही कामे मार्गी लागण्यासाठी नगरपरिषदेकडे कार्यकाळ पूर्ण केलेले व स्वतःला सामाजिक कामामध्ये झोकून दिलेले काही नगरसेवक मुदतवाढ देण्याची मागणी करीत आहेत. या स्थितीत नगरपरिषदेवर नव्याने नियुक्त झालेले प्रशासक प्रांताधिकारी यांना करोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण आणून विकासाचा गाडा ओढण्याची तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र नक्की.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here