पुणे: शहरात बाधितांपेक्षा आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या शनिवारी अधिक होती. शनिवारी चार हजार ७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत गेल्या १४ महिन्यात शहरात चार लाख रुग्ण करोनाच्या आजारातून बरे झाले आहेत. ( )

वाचा:

पुणे शहरात शनिवारी १७ हजार ११८ एवढ्या चाचण्या झाल्या. त्यामध्ये २८३७ जणांना झाल्याचे आढळले असून आतापर्यंत बाधितांची संख्या ही चार लाख ४५ हजार ५३९ एवढी आहे. तर शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या झपाटयाने घटत असून आता ३६ हजार ५८६ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात ५९ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत शहरात सात हजार ३०४ जण दगावले आहेत. तर शहराबाहेरील २३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दिवसभरात नऊ हजार ३५७ जणांना संसर्ग झाला आहे. १३३ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १४ हजार २४६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

पुण्यातील नवीन रुग्ण – २८३७
बरे झालेले रुग्ण – ४६७३
गंभीर रुग्णांची संख्या – १४०३
दिवसभरात मृत्यू – ५९

वाचा:

राज्याची शनिवारची स्थिती

– राज्यात ८६४ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
– ५३,६०५ नवीन रुग्णांचे निदान तर ८२,२६६ रुग्ण बरे होऊन परतले घरी
– राज्यात आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
– राज्यातील (Recovery Rate) ८६.०३% एवढे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९१,९४,३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५०,५३,३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ३७,५०,५०२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये तर २८,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
– सध्या राज्यात करोनाचे ६ लाख २८ हजार .

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here