लंडन: इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या जावयाच्या हाती ब्रिटनच्या तिजोरीची चावी असणार आहे. नारायण मूर्ती यांचे जावई यांना ‘ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पद अर्थमंत्र्याच्या समकक्ष आहे.

सध्या ऋषी सुनाक यांच्यावर ट्रेजरी विभागाच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी आहे. सुनाक यांच्या नियुक्तीची माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आली आहे. सुनाक यांच्यासह भारतीय वंशाच्या गृह सचिव प्रीती पटेल यांचीही ‘चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन भारतीय वंशांच्या अधिकाऱ्यांकडे ब्रिटनच्या अर्थ खात्याशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.

ब्रिटनचे अर्थमंत्री साजिद जाविद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ब्रेक्झिटच्या निर्णयानंतर काही आठवड्यानंतरच जाविद यांनी आपला राजीनामा दिला. जाविद यांना एक महिन्यानंतर ब्रिटनचा अर्थसंकल्प सादर करायचा होता. बोरिस जॉनसन सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता.

दरम्यान, ब्रेक्झिटनंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कमालीची नाजूक झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१९ या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने शून्य विकासदर नोंदवला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात औद्योगिक उत्पादन आक्रसून ०.८ टक्क्यांवर आले आहे. विशेषतः वाहन उद्योगाने देशाची निराशा केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here