गुवाहाटीः आसाम निवडणुकीचा निकाल गेल्या रविवारी लागला. पण मुख्यमंत्री कोण होणार? यावर गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये खल सुरू होता. आता हेमंत बिस्वा सरमा ( ) यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. हेमंत बिस्वा शर्मा हे असणार आहेत. गुवाहाटीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हेमंत बिस्वा सरमा हे लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी मावळते मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. आता हिमंत सरमा यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उद्या होणार आहे.

आसामच्या नव्या मुख्यमंत्र्यावरून भाजपमध्ये मोठा खल झाला. पक्ष नेतृत्वाने आणि सर्बानंद सोनोवाल या दोघांना दिल्लीत बोलावलं होतं. दोन्ही नेत्यांशी आधी वेगवेगळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर एकत्र बसून त्यांच्याशी चर्चा केली गेली. यानंतर हिमंत यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आघाडीवर होते. आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन होत आहे. हिमंत बिस्वा सरमा यांचा जोरदार प्रचार आसाममध्ये भाजपच्या विजयाचे एक मोठे कारण मानले जात आहे.

कोण आहेत हिमंत बिस्वा सरमा?

हिमंत सरमा हे आसामच्या जालुकबारी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकले आणि आमदार झाले. यावेळी त्यांनी १ लाख १९११ इतक्या मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. हिमंत बिस्वा सरमा यांनी २०१५ ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. सोनोवाल यांच्या इतकाच त्यांचा राज्यात प्रभाव आहे. २०१६ च्या विधासभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आसाममध्ये भाजपच्या विजयासोबत अलिकडेच सीएएविरोधी आंदोलन आणि करोनाने निर्माण झालेली स्थिती सांभाळण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. २०१६ मध्ये आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजपने नॉर्थ-ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सच्या अध्यक्षपदी नेमणूक केली होती. यानंतर ईशान्यतेली अनेक राज्यांमध्ये त्यांनी भाजपची सत्ता आणण्यात मोठ योगदा दिलं.

वकील ते मुख्यमंत्री पदाचा प्रवास

हिंमत सरमा यांचा गुवाहाटीत १ फेब्रुवारी १९६९ मध्ये जन्म झाला. आई मृणालिनी देवी, पत्नी रिनिकी भुयान आणि दोन मुलं असं त्यांचं कुटुंब आहे. कामरुप अकादमीतील प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी गुवाहाटी कॉटन कॉलेजमध्येमध्ये प्रवेश घेतला. राज्यशास्त्रात पदवी घेतली. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९१-९२ मध्ये ते कॉटन गुवाहाटी कॉलेजचे ते सरचिटणीस झाले. यानंतर त्यांनी लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदी घेतली आणि तसंच गुवाहाटी कॉलेजमधून पीएचडी केली. ५ वर्षे त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात वकीली केली. मे २००१ मध्ये ते पहिल्यांदा जालुकबारी मतदानरसंघातून निवडणूक लढले आणि आमदार झाले. त्यांनी आतापर्यंत आसाम सरकारमध्ये अर्थ, कृषी आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी झालेल्या वादानंतर जुलै २०१४ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here