मुंबई: करोनाच्या बाबतीत महाराष्ट्र करत असलेल्या कामाचं पंतप्रधान यांनी कौतुक केल्याचं राज्य सरकार सांगत असलं तरी भाजपच्या नेत्यांना त्याबाबत संशय आहे. ‘मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता पंतप्रधान कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही,’ असं भाजपचे प्रवक्ते यांनी म्हटलं आहे.

वाचा:

पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री यांना फोन करून महाराष्ट्रातील करोनाच्या स्थितीची माहिती घेतली होती. तसंच, मोदी यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक केल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं होतं. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका करणाऱ्या फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना टोला हाणला होता. त्यावर आता भाजपनं मुख्यमंत्री कार्यालयाच्या दाव्यावरच शंका उपस्थित केली आहे. ‘पंतप्रधानांनी कौतुक केल्याचं सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट. वास्तव माहिती लपवून पंतप्रधानांकडून कौतुक करून घेतल्याचा दावा करताना ’मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा,’ असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘स्वत:च स्वत:चा उदोउदो करत फिरायचं, आगा ना पिछा बोलत राहायचं, अपयश आलं की केंद्रावर ढकलायच ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे. सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं. कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती?,’ असा खोचक टोला उपाध्ये यांनी हाणला आहे.

‘आता घरबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं…’ या खेळाप्रमाणं पंतप्रधानानी कौतुक केल्याचा नवा खेळ खेळला जातोय,’ असंही उपाध्ये यांनी म्हटलं आहे. ‘प्रत्येक बाबतीत पीआर एजन्सी वापरू नका, हेच तर यांनी कालच्या पत्रात म्हटलं आहे, मग इतकं झोंबलं का?,’ असंही उपाध्ये यांनी पुढं म्हटलं आहे.

पंतप्रधानांच्या कौतुकाचा हवाला देत फडणवीसांना टोला लगावणाऱ्या जयंत पाटील यांचाही उपाध्ये यांनी समाचार घेतला आहे. ‘शिवसेनेचा संगतगुण बहुधा राष्ट्रवादीला लागला आहे. खरंतर टोपेंनी जालन्यात जास्त लस दिल्याबद्दल जयंत पाटील यांनी खुलासा करायला हवा होता. बिचारे नितीन राऊत असो की पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात असो की आणखी कुणी. त्यांच्या पत्राचीही कुणी दखल घेत नाही तरी सचिन सावंत मात्र ‘बेगाने शादी में….’ या म्हणीप्रमाणे नाचत राहतात. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्राचा निशाणा नेमका लागलाय असा याचा अर्थ आहे,’ असं उपाध्ये यांनी शेवटी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here