मुंबईः शिवसेना नेते यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार आणि राऊत यांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. याबाबत संजय राऊत यांनी आज खुलासा केला आहे.

‘देशाला एक उत्तम अशा विरोधी आघाडीची गरज आहे. जशी महाराष्ट्रात महाविकासआघाडी काम करत आहे, अशाप्रकारे आघाडी आपण उभं करु शकतो का? यासंदर्भात काल माझी शरद पवारांसोबत चर्चा झाली. त्यांची प्रकृती सध्या ठिक नाही पण लवकरच यासंदर्भात हालचाली सुरु होतील,’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

‘नवीन नेतृत्व हवंय असं मी म्हणत नाहीये. पण एकत्र बसून ठरवायला हवं. प्रत्येकाला वाटतं मीच नेता आहे पण तसं नाही आघाडी अशी निर्माण होत नाही. जसं महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंनी प्रमुख केलं व सरकार उत्तम चाललं आहे. देशातील ही एक आदर्श आघाडी आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील अशाप्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. अशाप्रकारचं मत मी व्यक्त केलं आहे,’ असंही राऊतांनी म्हटलं आहे.

‘पश्चिम बंगाल निवडणुक निकालावरही त्यांनी भाष्य केलं आहे. तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारली. ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. भविष्यात या देशात विरोधीपक्षाची भक्कम आघाडी उभी करावी आणि एक आव्हान उभं करावं, अशी सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही. काँग्रेस पक्षाला आसाममध्ये चांगलं यश मिळालं आहे. पण सत्तेवर येऊ शकले नाही. केरळ आणि तामिळनाडूत त्यांना थोडंफार यश आलंय. पण काँग्रेसने अजून मुसंडी मारणं जास्त गरजेचं आहे. या देशाला उत्तम आघाडीची गरज आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्र पॅटर्न किंवा महाराष्ट्र मॉडेल हा संदर्भ गेल्या महिन्याभरापासून वारंवार मी देतोय. याच महाराष्ट्र मॉडेलचा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्याच महाराष्ट्र मॉडेलवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. महाराष्ट्र या लढाईत पुढे आहे. महाराष्ट्राने स्वत:ची लढाई स्वत:च्या बळावर निर्माण केली आणि लढली. त्याचं श्रेय नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना द्यावं लागेल,’ असंही ते म्हणाले.

‘आदित्य ठाकरेंच्या पुढाकारातून शिवसेनेनं तीन कोविड सेंटर उभारले आहेत. महाराष्ट्राची स्थिती का चांगली आहे? सरकारला समांतर अशी कोविड सेंटर व यंत्रणा राजकीय कार्यकर्ते देखील उभी करत आहेत. त्यामुळे सरकारचा भार कमी होतो आहे. हे इतर राज्यांमध्ये झालं नाही. आता अनेक संघटना, संस्था काम करतात, मी पक्षांची नावं घेत नाही. पण त्यांना हे शिवसेनेसारखं काम करता आलं नाही. त्यामुळे आज अनेक राज्यांमध्ये ज्या चिता पेटलेल्या दिसत आहेत, कब्रस्तानात जागा नाही हे चित्रं जे जगात गेलं आहे, त्याचं कारण तेच आहे.’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here