मुंबईः मुंबईत करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं चित्र आहे. मार्च- एप्रिलमध्ये करोना रुग्णांची दैनंदिन संख्या १० ते ११ हजारांवरुन आता थेट २ हजारांवर आली आहे. मुंबईत करोना लढ्याला यश मिळत असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत मार्च- एप्रिलमध्ये करोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला होता. आता मात्र, करोना रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसत आहे. १० ते ११ हजारांवर पोहचलेली रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत २ हजार ४०३ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ३ हजार ३७५ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.

वाचाः

काही दिवसांपूर्वी शहरातील सरासरी रुग्ण दुपटीचा कालावधी ४० दिवसांवर घसरला होता. तो आता सरासरी १५३ दिवसांपर्यंत वाढला आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आजपर्यंत मुंबईत ६ लाख १३ हजार ४९८ जण करोनामुक्त झाले आहेत.

वाचाः

मुंबईत आज दिवसभरात ६८ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं आतापर्यंत एकूण १३ हजार ८१७ जणांनी करोनामुळं आपले प्राण गमावले आहेत. तर, सध्या ४७ हजार ४१६ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here