दिल्लीः करोना लसीकरणावरुन राज्यात वाद पेटला असतानाच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच, करोना लसींच्या निर्यातीवर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या तीन महिन्यात ९३ देशामध्ये साडे सहा कोविड लसी सरकारने विकल्या आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

‘सरकारने ज्या ९३ देशात करोना प्रतिबंधित लसी विकल्या त्या देशांत मृत्यूदर अगदीच कमी आहे. त्याउलट, भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेत जवळपास एक लाखांपर्यंत लोकांनी जीव गमावला आहे. जर, लसी निर्यात केल्या नसत्या तर या लोकांचे प्राण वाचले असते, असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे. तसंच, केंद्र सरकारमधील काही जण म्हणतील आपण आंतरराष्ट्रीय कराराद्वारे बांधले गेलो आहोत. अमेरिका, फ्रान्स आणि युनियन देशदेखील या करारांचे पालन करतात. पण त्यापैकी कोणत्याही देशाने इतर देशांना प्राधान्य दिले नाही,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः

‘केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा जपायची होती व इतर देशांकडून कौतुक करुन घ्यायचं होतं, म्हणूनच त्यांनी परदेशात लसी निर्यात केल्या होत्या का?, असा सवाल त्यांनी केला आहे. शिवाय, इतर देशांना लसी पुरवण्या अगोदर आपल्या देशातील नागरिकांची लसीकरण पूर्ण करावे,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here