चिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमधील स्थानिक वेळ सकाळी १०.२४ वाजण्याच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेत आले होते. हिंदी महासागरात या रॉकेटचे अवशेष कोसळले. मालदीवच्या हद्दीत या रॉकेटचे अवशेष कोसळले. पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर या रॉकेटचा बहुतांशी भाग जळून खाक झाला होता.
वाचा:
चीनने अवकाशात पाठवलेल्या ‘लाँग मार्च 5B’ या रॉकेटवरील नियंत्रण सुटल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जगात खळबळ उडाली होती. करोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या अनेक देशांची या रॉकेटने चिंता वाढवली होती.
वाचा:
वाचा:
नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी म्हटले की, अंतराळ मोहिमा आखणाऱ्या देशांनी आपले एखादे यान, रॉकेट पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत आणत असताना पृथ्वीवरील लोकं आणि मालमत्तेचे नुकसान कमी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वच देशांनी जबाबादारीने वागणे अपेक्षित असून अंतराळ कार्यक्रमाबाबत पारदर्शकता बाळगणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.
वाचा:
अमेरिकेच्या अंतराळ स्थानक केंद्राला आव्हान देण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू झाला आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही दिवसांपूर्वीच हे २१ टन वजनाचे ‘लाँग मार्च ५ बी’ श्रेणीतील रॉकेट लाँच केले होते. अंतराळात चीनकडून अंतराळ स्थानक केंद्र उभारले जात आहे. नियोजनानुसार हे रॉकेट समुद्रात कोसळणार होते. मात्र, त्याआधीच नियंत्रण गमावल्याने चिंता वाढली होती.
रॉकेटचा हा तुकडा जमिनीवर कोसळण्याऐवजी समुद्रात कोसळण्याची शक्यता अधिक होती. चीनचा 2021-035B हे रॉकेट १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद होते. नियंत्रण गमावलेले हे रॉकेट दक्षिण-पूर्व अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरिबियन, पेरू, इक्वाडोर कोलंबिया, व्हेनेझुएला, दक्षिण युरोप, उत्तर किंवा मध्य आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण भारत किंवा ऑस्ट्रेलियाजवळ कोसळण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times