मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले. गेल्या १३० वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातून पर्यटक, अभ्यासक मुंबईत येतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असायला हवी. त्यासाठी, मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबतही सूचित केले आहे, असे अजित पवार यांनी नमूद केले. हा डबेवाल्यांसाठी मोठा दिलासा आहे. आजच्या बैठकीला मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील,
व इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.
दररोज पोहचवतात दोन लाख डबे
मुंबईच्या डबेवाल्यांची जगभरात ख्याती आहे. ब्रिटनच्या राजघराण्यापासून सर्वांनाच या डबेवाल्यांचे आकर्षण आहे. मुंबईत सुमारे पाच हजार डबेवाले असून दररोज दोन लाख डबे घरातून चाकरमान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम हे डबेवाले करतात. बई डबेवाला संघटना एक रोटी बँकही चालवते. त्या माध्यमातून टाटा मेमोरियल हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल आणि वाडिया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसोबतच्या नातेवाईकांना मोफत भोजन दिलं जातं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times