नाशिकः जिल्ह्यात करोनाचा संसर्ग झापाट्याने वाढला आहे. लोकप्रतिनिधीही करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. नाशिकच्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं रविवारी रात्री करोनामुळं निधन झालं आहे.

सत्यभामा गाडेकर यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

सत्यभामा गाडेकर या प्रभाग क्रमांक ‘२२ ब’ चे प्रतिनिधित्व करत होत्या. तसंच, गाडेकर या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. नाशिक महानगरपालिकेत त्या तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडुन आल्या होत्या. तसंच, पक्षात विविध महत्त्वाची पदेही त्यांनी भूषवली होती. नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी आक्रमकपणे भूमिका घेतल्या होत्या. करोना काळातही त्यांनी मोठं काम केलं होतं. त्यांच्या निधनानं शिवसैनिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

वाचाः

दरम्यान, एप्रिलमध्ये नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे करोनामुळं निधन झाले होतं. त्या शिवसेनेच्या प्रभाग २४ मध्ये विद्यमान नगरसेविका म्हणून त्या काम पाहत होत्या. त्या नाशिक महापालिका निवडणुकीत चार वेळा निवडुन आल्या होत्या.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here