गेल्या काही महिन्यांपासून बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने करोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक भयंकर असल्याचेही निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये पहिल्या लाटेला सुरुवात झाली, ती यंदा फेब्रुवारीपर्यंत कायम होती, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पहिली लाट थंडावल्यानंतर सर्वच यंत्रणांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसंच, जुलै- ऑगस्टमध्ये करोनाची तिसरी लाट येणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या तिसऱ्या लाटेचा सर्वात अधिक फटका बालकांना बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेत पालकांनी काय काळजी घ्यावी? व सरकारकडून काय उपाययोजना करण्यात येत आहे. याचा घेतलेला आढावा

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असतानाच आता तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग झाला आहे. तिसऱ्या लाटेतही संसर्ग होण्याची शक्यता केंद्र सरकारने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही आत्तापासून कठोर पावलं उचलली आहेत.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका; पालकांनी काय काळजी घ्यावी?

गेल्या काही महिन्यांपासून बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने करोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक भयंकर असल्याचेही निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये पहिल्या लाटेला सुरुवात झाली, ती यंदा फेब्रुवारीपर्यंत कायम होती, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पहिली लाट थंडावल्यानंतर सर्वच यंत्रणांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसंच, जुलै- ऑगस्टमध्ये करोनाची तिसरी लाट येणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या तिसऱ्या लाटेचा सर्वात अधिक फटका बालकांना बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेत पालकांनी काय काळजी घ्यावी? व सरकारकडून काय उपाययोजना करण्यात येत आहे. याचा घेतलेला आढावा

बालकांना संसर्गाची भीती का?
बालकांना संसर्गाची भीती का?

एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के मुलांचा लसीकरणात समावेश झाला नाही. त्यामुळे हा मोठा वर्ग असुरक्षित व धोकादायक स्थितीत आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. ‘मदरहूड रुग्णालया’चे बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारेख म्हणाले, ‘बहुतेक मुलांमध्ये सौम्य; तसेच गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसली आहेत. लहान मुलांना लस देण्याबाबत संभ्रम आहे. लसीकरणामुळे प्रौढांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी होऊ शकते; पण लहानांमध्ये ते वाढू शकते. मुलांना जास्त त्रास होत नसला; तरीही ते संसर्गाचे वाहक ठरू शकतात.’ कोलंबिया एशिया रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश बाडगे म्हणाले, ‘मुलांसाठी लसीकरण आवश्यक आहे. फायझर-बायोटेक या अमेरिकेत लसीकरण करणाऱ्या लशीचा डोस मुलांना दिला जात आहे. १२ ते १५ वर्षे वयोगटातील लशीने १०० टक्के कार्यक्षमता दर्शवली आहे. सहा महिने ते ११ वर्षे वयोगटातील मुलांच्या दुसऱ्या गटावरील अभ्यास ‘मॉडर्ना’तर्फे सुरू झाला आहे.’

​पालकांनी काय करावे?
​पालकांनी काय करावे?

– खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल अथवा टिश्यूपेपर धरा.

– समोरच्या व्यक्तीशी बोलताना कमीत कमी सहा फूट अंतर राखावे. आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळा.

– अस्वच्छ हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका.

– मुलांना ताप, खोकला; तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चूकवू नका.

– निरोगी आतडे मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. दह्यासारख्या पदार्थातील प्रोबायोटिक्स आतडे निरोगी ठेवते. कच्च्या अथवा अर्धवट शिजवलेल्या मांसाचे सेवन करणे टाळा.

– मुलांना सतत एकाच जागी बसवून न ठेवता त्यांच्या शारीरिक हालचाली वाढवून त्यांना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित करा.

– शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी तिसरी लाट अधिक गंभीर असू शकते. १२ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. रोग बरा करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे अधिक उत्तम ठरते.

– डॉ. तुषार पारेख,

बालरोगतज्ज्ञ, मदरहूड रुग्णालय

बालरोगतज्ज्ञांचा कोव्हिड टास्क फोर्स
बालरोगतज्ज्ञांचा कोव्हिड टास्क फोर्स

करोनाची तिसरी लाट येणार असून, यामध्ये लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्यात कोव्हिड टास्क फोर्स तयार करण्यात येण्याच्या हालचाली सुरु आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोविड टास्क फोर्स तयार केले आहेत. रुग्णांमधील माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर प्रकार कसा ओळखायचा, त्याद्वारे त्यांना कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची, याबाबत या टास्क फोर्सद्वारे दिशानिर्देश तयार केले जाणार आहेत. बाधित मुलांची संख्या वाढल्यास बालरोग तज्ज्ञांवरील ताण वाढणार आहे. त्यामुळे परिचारिकांनाही याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अद्याप लहान मुलांसाठी लस उपलब्ध न झाल्यामुळे सुरक्षित वावर, मास्क, सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा अवलंब अधिक प्रभावीपणे करावा लागणार असल्याचे, तसेच पालकांनी याबाबत अधिक सजग राहणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.

बालकांसाठी कोव्हिड सेंटर
बालकांसाठी कोव्हिड सेंटर

करोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन मुंबई पालिका अधिक सावध झाली. त्यासाठी पालिकेकडून वरळीतील मुलांसाठी ५०० खाटांचे जम्बो करोनाकेंद्र सेवेत आणले जाणार आहे. त्यात, ७० टक्के ऑक्सिजन आणि २०० आयसीयू खाटांचा समावेश केला आहे. वरळीत उभारले जाणारे करोना केंद्र हे १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी असेल. हे नवीन केंद्र ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. या केंद्रासाठी पालिकेस ‘सीआरएस’ निधीतून ५० कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. मुंबईप्रमाणे इतर जिल्ह्यात व शहरातही कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here