ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज करोना संसर्ग प्रतिबंध उपाययोजना आणि लसीकरण आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी खबरदारी घेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर कसा रोखता येईल, याबाबत ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी विशेष भर दिला.
मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जे-जे आवश्यक आहे ते-ते करा. सद्याच्या संचारबंदीचे काटेकोर पालन करावे. त्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्याला आवश्यक असणारा प्राणवायुचा पुरवठा, औषधे, रेमडेसिव्हीर आणि अॅन्टीजेन किट याची व्यवस्था केली जाईल, असे सांगून त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, नोडल अधिकारी सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्याशी थेट मोबाईलवर संपर्क साधला.
वाचाः
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशीही संपर्क करत त्यांनी टास्कफोर्स पाठविण्याची सूचना करून जिल्ह्याला १० मे.टन प्राणवायुचा पुरवठा करण्यास सांगितले. ग्रामीणस्तरावर आवश्यकतेनुसार संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा, असेही ते म्हणाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी संगणकीय सादरीकरण केले. अपर जिल्हाधिकारी श्री. पवार, आयुक्त डॉ. बलकवडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांनीही यावेळी सद्य परिस्थितीचा आढावा दिला.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times