औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्सूल सावंगी या तलावात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. लॉकडाऊन असतानाही मासे पकडण्यासाठी हे दोन्ही मित्र गेले होते. पण आजचा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा ठरला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा तरुण पाण्यात बुडत होते, तेव्हा त्यांनी खूप आरडाओरड केली. यावेळी गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत फक्त बघ्याची भूमिका घेतली.

नागरिकांकडून तात्काळ या घटनेची माहिती हर्सूल पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन तरुणांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खरंतर, राज्यामध्ये सध्या अवकाळी पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे अनेक नदी, नाले, तलावं भरून वाहत आहेत. अशात तरुणांना पाण्याचा अंदाज न लागल्याने दोन्ही तरुण बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मदतीलाही कोणी धावून न आल्याने तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here