मुंबईः सध्या सोशल मीडियावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांचं ट्वीट व्हायरल होतं आहे. या ट्वीटमध्ये त्यांच्यातील व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यातील संवाद आहे. अलीकडेच जितेंद्र आव्हाड यांनी पवारांची भेट घेतली त्या वेळेचा प्रसंग त्यांनी ट्वीट केला आहे. सोशल मीडियावर हे ट्वीट चांगलंच चर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळं ते त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी आराम करत आहे. तरीदेखील शरद पवार राजकारणात सक्रीय आहेत. अनेक कार्यकर्ते व महाविकास आघाडीतील नेत्यांनाही ते भेटी देत असतात. अलीकडेच संजय राऊत यांनीही शरद पवारांची भेट घेत राजकीय घडामोडींवर चर्चा केली होती. आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही पवारांची भेट घेतली असून राज्यातील घडामोडींवर पवारांबद्दल चर्चा केली. त्यानंतरच त्यांनी एक ट्वीट केलं आहे.

‘काल साहेबांची अचानक भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचारला. कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याचं काय झालं. मी उत्तर दिले की, ‘साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत’. मग म्हणाले उशीर कशाला, मी म्हटलं आपल्या तारखेची वाट पाहतोय. त्यावर लगेचच पवारांनी लगेचच या आठवड्यात कार्यक्रम करुयात, पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत,’ असं उत्तर दिलं. हा प्रसंग जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरुन शेअर केला आहे.

दरम्यान, टाटा रुग्णालयापासून ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हाजी कासम चाळ परिसरात म्हाडाचे १०० फ्लॅट्स आहेत. हे फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला देण्याचे आव्हाड यांनी जाहीर केले होते. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ३९ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून येत असतात. तर, ६१ टक्के रुग्ण देशभरातून आलेले असतात. टाटा कॅन्सर हॉस्पिटल दरवर्षी ८० हजार रुग्णांवर उपचार करते. तर दररोज सुमारे ३०० रुग्णांच्या राहण्याची सोय करण्याची आवश्यकता भासत असते. मात्र यापैकी सर्वच रुग्णांच्या राहण्याची सोय होण्याची सध्याची स्थिती नाही. आता सरकारने हॉस्पिटलला १०० फ्लॅट्स दिल्यामुळे रुग्णांची सोय करता येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here