पुणे : उजनी धरणातील पाणी प्रश्नावरून महाविकास आघाडीतच मोठी धुसफूस निर्माण झाली आहे. या पाण्यावरून राष्ट्रवादीचे मंत्री ( Dattatray Bharane) आणि सोलापूरचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आमने-सामने आले आहेत. ५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी इंदापूर तालुक्यासाठी देण्यावरून जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सिंचन भवन येथे झालेल्या बैठकीत गोंधळ निर्माण झाला.

उजनीतील पाणी हे सोलापूरसाठी असल्याने ते देण्यास सोलापूरमधील प्रतिनिधींनी विरोध केला असता भरणे यांनी सोलापूरचे पाणी कमी होणार नाही; पण इंदापूरला पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेतली. ‘या विषयात कोणी राजकारण करू नये. सोलापूरचे पाणी घेतले, तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारण सोडेल’ असे वक्तव्यही दत्तात्रय भरणे यांनी केले.

उजनी धरणाच्या पाणी व्यवस्थापनाबाबत सिंचन भवन येथे भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भर बैठकीत आणि इंदापूरमधील लोकप्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाल्याने गोंधळ निर्माण झाला.

‘सोलापूरचे पाणी हे कमी होणार नाही. मात्र, इंदापूरला पाणी मिळाले पाहिजे. सोलापूरची पाण्याची योजना दहा वर्षांपासून अपूर्ण आहे. ती येत्या दहा महिन्यांत पूर्ण करून सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार आहे. या विषयावर कोणी राजकारण करू नये. सोलापूरचे पाणी घेतले, तर आमदारकी आणि राजकारण सोडून देईल’ असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.

‘उजनी धरणातून कर्नाटक राज्यामध्ये पाणी जाते. ते पाणी अडविले पाहिजे. खडकवासला धरणातून इंदापूरला पाणी मिळत असले, तरी इंदापूर हे सर्वांत शेवटी असल्याने प्रत्यक्ष मिळणारे पाणी हे कमी झालं आहे’ असे भरणे यांनी स्पष्ट केले. या विषयावर पुन्हा बैठक घेऊन मार्ग काढला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वाद नेमका कशामुळे?
उजनी धरणातील पाणी वापरातून निर्माण होणारे सांडपाणी हे उचलून शुद्धीकरण करून शेटफळगढे येथे मुठा उजवा कालव्यात सोडणारी योजना आहे. त्याद्वारे पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ही योजना झाल्यास उजनीतील सुमारे पाच टीएमसी पाणी हे इंदापूर तालुक्याला मिळणार आहे. मात्र, सांडपाणी दाखवून उजनीतील पाणी हे इंदापूरला देण्यात येणार असल्याचा सोलापूरकरांचा आरोप आहे. याच मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला वाद हा अजूनही संपत नसल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही दत्तात्रय भरणे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. त्यामुळे आगामी काळातही या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतच आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

2 COMMENTS

  1. เกมสล็อต ให้ทดลองเล่นฟรีและยังเป็นเว็บไซต์ PG SLOT 12iwins จบทุกค่ายเกมดัง สำหรับนักพนันออนไลน์

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here