रायपूरः छत्तीसगडमध्ये सोमवारपासून आणि होम डिलिवरी सुरू झाली. दारूची दुकानं ग्राहकांसाठी बंद करण्यात आली असून अॅपद्वारे बुकींग करून होम डिलिवरी देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजेपासून नागरिकांनी सरकारने दिलेल्या CSMCL Online अॅपवर दारूची ऑर्डर करण्यास सुरवात केली. पण जवळपास २ तासांच्या आत इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर येऊ लागल्या की अॅपच क्रॅश झाले.

अॅप मोठ्या संख्येत अचानक डाउनलोड होऊ लागले आणि ऑर्डर बुकींग हाताळू शकले नाही. पण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्रुटी दूर केल्याचा दावा केला. पण दुपारी १ वाजेपर्यंत अनेक नागरिक ऑर्डरसाठी प्रयत्न करत होते. एका अंदाजानुसार फक्त रायपूरमध्ये सकाळी २ तासांत ५० हजारांहून अधिक ऑर्डर प्लेस झाल्याचं सांगण्यात येतंय.

CSMCL Online अॅप १ लाखावर डाउनलोड झाले

सकाळी अॅपचे सर्वर क्रॅश झाले होते. ते आता दुरुस्त करण्यात आले आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अरविंद पटले यांनी दिली. दारूची ऑर्डर देण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून १ लाखाहून अधिका नागरिकांनी अॅप डाउनलोड केले आहे. दुकानं चालवणाऱ्या खासगी एजन्सीचे कर्मचारीच घरोघरी जाऊन दारूची डिलिवरी करत आहेत. दारूसाठी वेगळे डिलिवरी ठेवण्यात आले नाही. दुकानं बंद असल्याने या दुकानांमध्ये काम करणारे कामगारच दारूच्या डिलिवरीचं काम करत आहेत.

अॅपवर ऑर्डर बुकींग केल्यानंतर सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत दारूची डिलिवरी केली जाते. दारूच्या ऑर्डरसाठी ग्राहकांना आपला मोबाइल नंबर, आधार कार्ड आणि पूर्ण पत्ता द्यावा लागतो. ऑनलाइन ऑर्डर करताना दारूचे नाव आणि त्याची किंमत दिसून येते. दुकानापासून १५ किलोमीटरच्या अंतरापर्यंत दारू मागवली जाऊ शकते. तसंच दारूच्या डिलिवरीसाठी १०० रुपये चार्ज द्यावा लागतो. पेमेंटही ऑनलाइनच होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here