मुंबई: महाराष्ट्रातील संसर्गाचा विळखा सैल होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. राज्यात आज दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून हा खूप मोठा दिलासा ठरला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून गेल्या काही आठवड्यांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे ६१ हजार ६०७ इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आज करोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. ( )

वाचा:

करोनाची पहिली लाट ओसरून काही काळ लोटत नाही तोच राज्यात करोनाची दुसरी लाट आक्राळविक्राळ रूप धारण करून धडकली. रुग्णसंख्येचे सगळे उच्चांक दुसऱ्या लाटेत मागे पडले. एकवेळ तर दैनंदिन रुग्णसंख्या ७० हजारांच्या जवळ पोहचली होती. यामुळे सर्वांनाच धडकी भरली होती. मात्र या स्थितीचा आरोग्य यंत्रणांनी नेटाने मुकाबला केला असून गेले काही दिवस वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यातही यश आले आहे. यात आजचा दिवस खास ठरला आहे. आज रुग्णसंख्येत सर्वात मोठी घट पाहायला मिळाली आहे.

वाचा:

राज्यात गेल्या २४ तासांत ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ६१ हजार ६०७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ४४ लाख ६९ हजार ४२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते असून सध्या हे प्रमाण ८६.९७ टक्के इतके झाले आहे. राज्यात आज करोनाने ५४९ रुग्ण दगावले असून राज्यातील करोना मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. आतापर्यंत करोनाच्या २ कोटी ९६ लाख ३१ हजार १२७ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील ५१ लाख ३८ हजार ९७३ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १७.३४ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ३६ लाख ७० हजार ३२० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २६ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आली सहा लाखांच्या खाली

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. सात लाखांच्या उंबरठ्यावर पोहचलेला हा आकडा कमी कमी होऊन आज सहा लाखांच्या खाली आला आहे. सध्या राज्यात ५ लाख ९० हजार ८१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण असले तरी तेथील आकडा १ लाखाच्या आत आला आहे. पुणे जिल्ह्यात आता ९७ हजार ५९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर जिल्ह्यात ५६ हजार ४५८, पालिका क्षेत्रात ४७ हजार ५४, नाशिक जिल्ह्यात ३४ हजार ७५५ तर जिल्ह्यात ३४ हजार १८५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत आज १ हजार ७८२ तर पुणे पालिका हद्दीत आज १ हजार २७२ नवीन रुग्णांची भर पडली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here