मुंबई: मुंबईमध्ये प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने या लसींची जागतिक पातळीवरून खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिली. शहरातील वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यासमवेत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ( Aaditya Thackeray On )

वाचा:

‘सध्या करोना प्रतिबंधक लससाठी स्मार्टफोनद्वारे संबंधित ॲपवर नोंदणी करावी लागते पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसेच जे कोविन अॅप ऑपरेट करू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत,’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

वाचा:

मुंबईची लसींची अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याचे आमचे प्रयत्न सतत चालू आहेत. आपल्या विनंतीनंतर मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी झाल्याने आता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राइव्ह-इन लसीकरण मोहिमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असेही मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

वाचा:

गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही आज महापालिकेने जारी केल्या आहेत, अशी माहितीही मंत्री ठाकरे यांनी दिली. राज्यातीतील इतर सर्व शहरांनीही ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभरित्या लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राइव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी, असे आवाहनही आदित्य यांनी केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here