तामिळनाडूती चेन्नईहून ऑक्सिजन टँकर तिरुपतीच्या दिशेने रवाना झाला. पण हा ऑक्सिजिन टँकर वेळेत पोहोचू शकला नाही आणि त्याला उशिरा झाला. यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांना तातडीने ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आल, अशी माहिती चित्तूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. हरी नारायणन यांनी दिली.
ही घटना सोमवारी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या दरम्यान घडली. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने व्हेंटिलेटवर असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला. फक्त ५ मिनिटांच्या कालावधीत ही घटना घडली. आता ऑक्सिजन टँकर रुग्णालयात दाखल झाला असून परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली आहे, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
इतर रुग्णांचा प्रकृती स्थिर करण्यासाठी ३० डॉक्टरांची टीम काम करत आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले होते. आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे आणि रुग्णालयाकडे पुरेसा ऑक्सिजनचा साठा आहे. तसंच ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच असून आणखी टँकर सकाळी दाखल होणार आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
ऑक्सिजन टँकर अतिशय महत्त्वाच्या क्षणी दाखल झाल्याने मोठा दुर्घटना टळली. आता चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही. सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. तसंच यात कुठलिही तांत्रिक चूक नव्हती, असंही जिल्हाधिकारी हरी नारायणन यांनी स्पष्ट केलं.
तिरुपतीमधील रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची खरबदारी घेण्याचे निर्देशही रेड्डी यांनी दिले आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतोय की नाही याची वेळोवेळी खबरदारी घेण्यात यावी. तसंच तज्ज्ञांकडून तंत्रज्ञांची माहिती करून घ्यावी. रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यावर लक्ष द्यावं. ऑक्सिजनची वाहतूक आणि पुरवठा सुरूच आहे. त्याकडे लक्ष देऊ नये, असे निर्देश रेड्डी यांनी दिले.
रुग्णालयात ७०० ऑक्सिजन बेड आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने किंवा रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी एकाचवेळी अनेक ऑक्सिजनचे सिलिंडर लावत असल्याने ऑक्सिजनचा दबाव कमी झाल्याने ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होतोय. मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. संतप्त नातेवाईकांनी औषधं आणि बाटल्या फेकल्या.
डॉक्टरांची शर्थीचे प्रयत्न करून अनेकांचं प्राण वाचवले आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. रुग्णालयातील सुरक्षेसाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक रवाना करण्यात आली असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times