काय म्हणाले रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष?
कुठल्याही राज्ये किंवा प्रदेशांप्रमाणे रेल्वेची स्थिती काही वेगळी नाही. रेल्वेही करोनाच्या संसर्गाचा सामना करत आहे. आम्ही वाहतुकीचं काम करतो. प्रवासी आणि मालवाहतूक करतो. यामुळे रोज जवळपास १ हजार कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होत आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी दिली.
आमच्याकडे हॉस्पिटल्स आहेत. बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. रेल्वे हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच प्लांट उभारण्यात आले आहेत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतो. ते लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. गेल्या वर्षी मार्चपासून ते आतापर्यंत रेल्वेच्या १९५२ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे, असं शर्मा यांनी सांगितलं.
रेल्वे कर्मचाऱ्यांना करोना योद्ध्यांचा दर्जा देण्याची मागणी
करोना व्हायरसच्या संकटात डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पहिल्या फळीतील करोना योद्धे ठरवण्यात आलं. त्यांच्याप्रमाणेच रेल्वे कर्मचाऱ्यांना भरपाई दिली गेली पाहिजे. रेल्वे कर्मचाऱ्यांचाही करोनाने संसर्गाने मृत्यू होत आहे, अशी मागणी ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. काही दिवसांपूर्वीच हे पत्र रेल्वे मंत्र्यांना देण्यात आलं आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच दिले गेले आहे. तेवढेच कवच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना द्यावे, आता देत असलेल्या २५ लाखांची भरपाई कमी आहे, असं संघटनेनं पत्रात म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times