नागपूर: निवृत्ती वेतन काढण्याकरिता ना हकरत प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारणारा येथील प्रागतिक माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक व वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. मुख्याध्यापक (वय ५७) व वरिष्ठ लिपिक (वय ५२),अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. ( Nagpur )

वाचा:

ऑगस्ट २०२० मध्ये तक्रारदार हे सहाय्यक शिक्षक पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीच्या सहा महिन्यांपूर्वी शिक्षकाच्या निवृत्त वेतनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (माध्यमिक) पाठविणे नियमानुसार बंधनकारक होते. परंतु, तक्रारदाराचा प्रस्ताव मुख्याध्यापक व लिपिकाने पाठविला नाही. तक्रारदाराने मुख्याध्यापकाची भेट घेतली असता मुख्याध्यापकाने लिपिकाला भेटायला सांगितले. त्यानुसार तक्रारदार हे लिपिक कुरळकर यांना भेटले. त्यांनी शाळेच्या ना हरकत प्रमाणपत्रासह विवरणपत्रात काही राहिलेले मुद्दे भरून ते कोषागार कार्यालयात जमा करण्यास सांगितले. निवृत्त शिक्षकाने त्यानुसार विवरण पत्र भरलेही. त्यानंतर नाहकरत प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्याध्यापक व लिपिकाने शिक्षकाकडे शाळेच्या देखभालीच्या नावाखाली २० हजार ५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली.

वाचा:

अधीक्षक , अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सारंग मिराशी, हेड कॉन्स्टेबल दिनेश शिवले, गजानन गाडगे, मंगेश कळंबे, सरोज बुधे आणि विनोद यांनी तक्रारीची पडताळणी केली व शाळेत सोमवारी सापळा रचला. तेव्हा मुख्याध्यापक व लिपिकाने लाच घेताच एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली. दोघांविरुद्ध स्टेशनमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here