मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. या आरोपांचा पुरावा म्हणून परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या व्हॉट्सअॅप संभाषणाचे पुरावेही दिले होते. या आरोपांमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
वाचा:
अॅड. जयश्री पाटील यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडं सोपवावी, अशी मागणी केली होती. न्यायालयानं ती मान्य करत या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.
काही दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयनं देशमुख यांच्या घरावर व अन्य मालमत्तांवर धाडी घातल्या व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या या कारवाईला देशमुख यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. मात्र, सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीनं आता देशमुख यांच्या मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times