मुंबईः सर्वोच्च न्यायालय व निती आयोगानं कौतुक केलेल्या करोना व्यवस्थापनाच्या ”ची सध्या देशभरात चर्चा आहे. मात्र, नेते यांनी ठाकरे सरकार व मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असताना मुंबईत मात्र करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजना, ऑक्सिजनचं व्यवस्थापन यासगळ्यामुळं मुंबईत करोना आटोक्यात आला असल्याची चर्चा आहे. मात्र, राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं मुंबई मॉडेलवर शंका उपस्थित केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी करोना चाचण्यांवरुन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं होतं. तर, आता भाजप नेते नितेश राणे ट्वीट करुन ‘मुंबई मॉडेल’ हा निव्वळ खोटेपणा असल्याचं म्हटलं आहे.

‘मुंबईतील करोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच मुंबई पॅटर्न आहे का? अनेकांनी मला याबाबत माहिती दिली आहे. मुंबईत एखादी व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असेल की त्याला पुण्याच्या कोविड वॉरमधून फोन येतो. अशा प्रकारे मुंबईत करोना रुग्णांची संख्या कमी दाखवली जात आहे,’ असा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला आहे. तसंच, मुंबई मॉडेल बनावट,’ असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

‘मुंबईतील करोना रुग्णांनी नोंद पुण्यात होते म्हणजेच त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसऱ्या शहरात नेलं जात नाही. तर फक्त त्यांची नोंद इतर शहरांच्या करोना आकडेवारीत केले जाते. म्हणून इतर शहरांतील करोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त आहे,’ असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here