मुंबई : राज्यावर आधीच करोनाचा जीवघेणा संसर्ग आणि अवकाळी पावसाचं सावट असताना आता आणखी एक संकट घोंगावत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रात १५ मे रोजीच्या आसपास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान खात्याकडून अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असून ते पुढे उत्तर पच्छिमेला सरकण्याची शक्यता आहे. तर यामुळे १४ मे रात्रीपासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

इतकंच नाही तर या राज्यांतील सर्व मच्छिमारांना व बोटींना परतण्यासाठी इशारे देण्यात आले असून पुढचे काही दिवस समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा राज्यात मान्सून वेळेवर दाखल होणार अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा मान्सूनवर काही परिणाम होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाहीतर चार महिन्यांत म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सून विभागाच्या म्हणण्यानुसार, 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज आहे तर 15 मे रोजी भारतीय हवामान विभाग पावसाचा पुढचा अंदाज सांगणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here