मुंबई : () सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) यांनी या प्रश्नावर भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील हेदेखील मुख्यमंत्र्यांसोबत होते. राज्यपालांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
‘गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल त्या अनुषंगाने आमची आजची भेट होती. त्या निकालामध्ये सांगितलंय की आरक्षण देण्याचा अधिकार राज्याच्या नसून केंद्राचा आहे. त्यामुळे आम्ही आमच्या भावना राष्ट्रपतींकडे आणि केंद्र सरकारकडे पोहोचवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार!
‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचा अधिकार केंद्राकडे दिल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे,’ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times