वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेत लसीकरण वेगाने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने अमेरिकेत आता वय वर्ष १२ ते १५ या वयोगटाचे लसीकरण होणार आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने फायजरच्या लशीला मंजुरी दिली आहे. गुरुवारपासून या वयोगटासाठीचे लसीकरण सुरू होणार आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने १२ ते १५ वर्ष या वयोगटाच्या मुलांसाठी विकसित केलेल्या फायजरच्या लशीला सोमवारी मंजुरी दिली. करोनाविरुद्धच्या लढाईत हा महत्त्वाचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया एफडीएचे कार्यवाहक आयुक्त जेनेट वुडकॉक यांनी व्यक्त केली आहे. या लशीच्या सुरक्षितेबाबत खोलवर अभ्यास आणि समीक्षा केली असल्याचे त्यांनी सांगत पालकांना आश्वास्त केले. अमेरिकेत याआधीच १६ वर्ष व त्या वयावरील व्यक्तीच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे.

वाचा:

अमेरिकन औषध निर्मिती कंपनी फायजरने ही १२ ते १५ या वयोगटासाठी विकसित केली आहे. मार्च महिन्याच्या अखेरिस फायजरने १२ ते १५ वर्ष या वयोगटातील २२६० स्वयंसेवकांची लस चाचणी केली होती. या चाचणीत लस घेतलेल्या मुलांमध्ये कोविडची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. या चाचणीत सहभागी झालेल्या बालकांना लस घेतल्यानंतर प्रौढांसारखेच दुष्परिणाम जाणवू लागले होते. यामध्ये थंडी वाजणे, थकवा येणे, ताप येणे आदी लक्षणे जाणवली. या चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर किमान दोन वर्ष देखरेख ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून लशीमुळे मिळालेली सुरक्षिता किती दीर्घकालीन आहे, याचा अभ्यास करता येईल.

वाचा:

वाचा:
फायजरशिवाय मॉडर्नानेही अल्पवयीनांसाठी लस विकसित केली आहे. मॉडर्नाने १२ ते १७ या वयोगटासाठी विकसित केलेल्या लशीची चाचणी सुरू आहे. येत्या काही महिन्यात या चाचणीचे निष्कर्ष जाहीर होण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here