नवी दिल्लीः करोना रुग्णांवरील उपचारात वापरण्यात येणाऱ्या औषधावरून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा इशारा दिला आहे. कुठल्याही नवीन आजारावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाची सुरक्षा आणि त्याची प्रभाव आवश्यक असतो. यामुळे क्लिनकल ट्रायल म्हणून कोविड रुग्णांवरील उपतारात वापरण्यात येणाऱ्या (Ivermectin) या औषधाला WHOचा विरोध आहे, असं WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्य स्वामीनाथ यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

जर्मन हेल्थकेअर अँड लाइफ सायन्सेस Merck कडूनही या औषधाच्या वापरावर इशारा देण्यात आला आहे. डॉक्टर स्वामीनाथन यांनी Merck चा इशाराही आपल्या ट्वीटमधून शेअर केला आहे. करोनावरील उपचारात आयव्हरमेक्टिनच्या वापराबाबत वैज्ञानिकांकडून सतत अभ्यास सुरू आहे, असं मर्कने म्हटलं आहे.

प्री-क्लिनिकल आभ्यासात करोनावरील उपचारात या औषधाच्या प्रभावाबाबत आणि क्लिनिकल सुरक्षेबाबत कुठलाही वैज्ञानिक आधार नाहीए. सुरक्षेसंदर्भात अभ्यासातून फार आशादायक डेटा समोर आलेला नाही, असं मर्कने म्हटलं आहे.

WHO ने आयव्हरमेक्टिनच्या वापराबाबत दोन महिन्यांपूर्वीच इशारा दिला होता. या औषधाने मृत्युचे प्रमाण कमी होणं किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा दर कमी होत नाही. करोनावरील उपचारात त्याच्या परिणामकारकेबाबत विश्वासार्ह असे पुरावे मिळाले नाहीत, असं WHO ने म्हटलं होतं.

एका दिवसापूर्वीच करोनावरील उपचारासाठी आयव्हरमेक्टिनच्या वापराबाबत गोवा सरकारने मंजुरी दिली आहे. ब्रिटन, इटली, स्पेन आणि जपानमधील तज्ज्ञांच्या पॅनेलने मृत्यू दरात घट, लवकर बरं होणं आणि करोना संसर्गातून मुक्त होण्याचं प्रमाण बघितल्यानंतर मंजुरी दिली आहे. यामुळे करोनावरील रुग्णांच्या उपचारासाठी आम्ही आयव्हरमेक्टिनला परवानगी दिली आहे. गोव्यात १८ वर्षांवरील करोनाच्या सर्व रुग्णांवर ५ दिवस रोज १२ mg आयव्हरमेक्टिन दिले जाणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here