सेवालयाच्या जवळच रवि बापटले यांच्या गाडीच्या समोर गाडी उभी असून त्यांना मारहाण होत असल्याचे पाहताच रवि बापटले यांचे सहकारी प्रकाश जाधव धावत आले. झटापटीत त्यांच्याही हातालाही दुखापत झाली आहे.
लातूरपासून जवळच असलेल्या हसेगाव येथे ‘आम्ही सेवक’ या संस्थेच्या वतीने बाधित अनाथ मुलांचे संगोपन करण्यासाठी सेवालय उभारण्यात आले. मात्र एचआयव्हीची भीती मनात बाळगून ग्रामस्थांकडून सेवालयाला सुरुवातीच्या काळात विरोध झाला. अनेक वेळा सेवालयाचे बांधकाम पडण्यात आले.
सेवालयातील मुलांना गावातील शाळेत प्रवेश देण्यास विरोध करण्यात आला. रवि बापटले यांना यापूर्वीही अनेक वेळा मारहाण करण्यात आली. एवढे कमी म्हणून की काय म्हणून या सेवालयातील पहिला मृत्यू झालेल्या मुलीच्या मृतदेहाचे कुत्र्याने लचके तोडले आणि रुग्णालय प्रशासनाला याची कसलीही माहिती नव्हती. अशा एक ना अनेक संकटाचा सामना करत सेवालय उभे आहे. रवि बापटले हे न खचता, जीवाचीही पर्वा न करता पालकत्वाची भूमिका खंबीरपणे निभावत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times