कोल्हापूर: प्रश्नी मुख्यमंत्री यांची आजची राज्यपालांची भेट हास्यास्पद आणि दिशाभूल करणारी आहे, असा आरोप प्रदेशाध्यक्ष आमदार यांनी केला. ‘ही कृती म्हणजे त्यांना जायचं आहे पंढरपूरला आणि त्यांनी गाडी पकडली गोव्याची’, असा टोलाही पाटील यांनी मारला. ( )

वाचा:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी मराठा आरक्षण प्रश्नी राज्यपाल यांची राजभवन येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी मराठा आरक्षणासाठी केंद्राने कायदा करावा अशा मागणीचे निवेदन त्यांना देऊन ते राष्ट्रपतींकडे पाठविण्याची विनंती केली. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘ज्या राज्यपालांना सहा महिने शिव्या दिल्या त्या राज्यपालांना नम्रपणे भेटून आज काय साध्य केले. राज्यपालांना भेटणे म्हणजे मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न आहे. त्यांना भेटून काहीच उपयोग नाही.’

वाचा:

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण द्यायचे असेल तर प्रथम मागास आयोग नेमावा लागेल, त्याचा अहवाल विधीमंडळात मंजूर करावा लागेल, तो केंद्रीय मागास आयोगाकडे पाठवावा लागेल. तेथून तो राष्ट्रपतींकडे जाईल आणि राष्ट्रपती राज्य सरकारकडे पुढील प्रक्रिया करण्यासाठी पाठवतील, असे सांगून पाटील म्हणाले, ही प्रक्रिया बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना निवेदन दिले. याचा काहीच उपयोग नाही. ही क्रिया दिशाभूल करणारीच आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here