जालना: रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणात देशात आणि राज्यांत बराच संघर्ष झाला परंतु, एकदा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मुस्लिम समाज असेल वा हिंदू समाज असेल सर्वांनी तो निकाल अंतिम मानून स्वीकारला. सर्वोच्च न्यायालय जे बोलते ते सर्वोच्च असते त्यानंतर आपण काहीच वेगळी दिशा देऊ शकत नाही. मराठा समाजाने हे लक्षात घेतले पाहिजे, असे मत मांडताना ही न्यायाची लढाई आहे आता मराठा बांधवांनी संयम राखलाच पाहीजे, असे आवाहन राज्यमंत्री यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना केले. ( )

वाचा:

महाराष्ट्रात जसा मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे तशीच मागणी देशभरातील विविध राज्यांतील समाजांतून होत आहे. त्याचा केंद्र सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून घटना दुरुस्ती केली तर मराठा समाजालाही न्याय मिळेल, असे सत्तार पुढे म्हणाले. राज्य सरकारच्या देण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून विशेष अधिवेशन बोलावून ठराव केंद्र सरकारला पाठवण्याची राज्य सरकारने तयारी केली आहे. मराठा समाजाने संयम राखावा, असे आवाहनही सत्तार यांनी केले.

वाचा:

यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयशी ठरल्याचे वक्तव्य केले आहे मात्र, त्यांच्या कोणत्याही बोलण्याकडे आपण गंभीरपणे पहात नाही. ते काय बोलतात, कसे बोलतात, कशा पद्धतीने बोलतात हे सगळ्या जगाला माहीत आहे, असे सत्तार म्हणाले. यांना माझ्यापेक्षा दानवे अधिक जास्त माहीत आहेत. त्यांच्या बोलण्याचा जास्त विचार आपण कधी करत नाही असेही सत्तार पुढे म्हणाले.

वाचा:

महाराष्ट्र पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शन्सबाबत धाड टाकली होती. पोलिसांची यात काही चूक नसताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसतात हे मोठे दुर्दैव आहे. विरोधी पक्षनेते अशा कारणासाठी पोलीस ठाण्यात गेले ही राज्यातील पहिली घटना आहे, अशा शब्दांत सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीत राजकारण करा पण करोना संकटाच्या काळात पक्षाचे झेंडे, बॅनर लाऊन राजकारण करू नका, या शब्दांत स्वतःच्या पक्षाच्या लोकांचे कान नितीन गडकरी यांनी टोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गडकरी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत आहेत पण या खालच्या लोकांना ते समजत नाही, अशी टीका सत्तार यांनी केली. सरकारी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात एकदा बिनसले की ते त्यांच्या पद्धतीने बोलतात. त्याची सत्यता तपासण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यानुसार काम सुरू आहे, असे उत्तर एका प्रश्नावर सत्तार यांनी दिली. अनिल परब यांच्या चौकशीची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. यात सरकारच्या कोणत्याही मंत्र्याचा संबंध नाही असेही सत्तार म्हणाले. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यावेळी उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here