मुंबई: ‘मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला देण्याचे काम राजकीय हेतुपोटी सुरू आहे. मी गृहमंत्री असताना मध्यला काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार नाराज असू शकते आणि त्यातूनच माझ्यामागे व चौकशी लावली असावी’, असे नमूद करत ईडी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे माजी गृहमंत्री यांनी सांगितले आहे. “सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं” असे नमूद करत आपण काहीही चुकीचे केलेले नाही, असे सांगण्याचाही देशमुख यांनी प्रयत्न केला. ( )

वाचा:

सीबीआय पाठोपाठ ईडीने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला. त्यावर देशमुख यांनी आपली बाजू स्पष्ट केली. ईडीद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व चौकशी केली जाणार असल्याचे मला माध्यमांतूनच कळले, असे सांगत या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे नाराज केंद्र सरकारकडून सीबीआय, ईडीमार्फत चौकशी केली जात असावी, अशी शक्यताही देशमुख यांनी व्यक्त केली.

वाचा:

न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतुने चालले आहे, असे सांगत त्यांनी केंद्रावरील आरोपाचा फोडही केला. गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळात मी गेल्या ऑक्टोबरमध्ये सीबीआयला महाराष्ट्रात तपास करावयाचा असल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक केले. सीबीआयच्या स्थापनेपासूनच अशाप्रकारच्या परवानगीची गरज नव्हती पण मी तो निर्णय घेतला. त्यानंतर दादरा नगर हवेलीचे सातवेळा खासदार राहिलेले यांनी मुंबईत आत्महत्या केली. या प्रकरणाच्या योग्य तपासाची मागणी विधिमंडळात अनेक सदस्यांनी केली. यावर एसआयटी स्थापन करून मी चौकशीचे आदेश दिले. प्रकरणातही गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या सर्व निर्णयांमुळेच केंद्राची नाराजी असावी आणि त्यामुळे माझ्या मागे सीबीआय व ईडीचा ससेमिरा लावला असावा, असे देशमुख म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here