पुणे: ‘भारतीय संगीताने मला जगात ओळख मिळवून दिली. संगीत साधनेमुळे आज करोडो भारतीय माझ्यावर आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो. मी प्रथम एक भारतीय नागरिक असून, त्यानंतर संगीतकार आणि गायक आहे’, असे प्रतिपादन पद्मश्री यांनी येथे केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ आयोजित चौथ्या पर्सोना टेक्नो कल्चरल फेस्ट २०२० च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अदनान सामी बोलत होते. यावेळी सामी यांना मेडॉलिक पर्सोना अवॉर्ड २०२० तर, पंडित यांना आयकॉनिक पर्सोना अवॉर्ड २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्यावसायिक सोनाली वर्मा, डॉ. मॅक जावडेकर, रॉबर्ट नेईस्मिथ, विद्यापीठाचे संस्थापक डॉ. विश्वनाथ राड, कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड आदी यावेळी उपस्थित होते. यानिमित्ताने एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी कला सादर केली.

सामी म्हणाले की, माझा जन्म इंग्लंडमध्ये झाला. मी भारतात वाढलो आणि माझे शिक्षण पूर्ण केले. माझी पत्नी जर्मनीची आहे, मात्र मी भारत निवडले. कारण माझे हृदय नेहमीच भारत आणि भारतीयांसाठीच धडकत राहिले आहे. एक भारतीय म्हणून मला नेहमीच माझ्या देशाचा अभिमान आहे. भारतीय संगीताने मला जगात ओळख मिळवून दिली. संगीत साधनेमुळे आज करोडो भारतीय माझ्यावर आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो. मी प्रथम एक भारतीय नागरिक आहे आणि त्यानंतर संगीतकार आणि गायक आहे, असे सामी यांनी सांगितले. संगीत हे जगण्याचे साधन आहे. संगीत तुम्हाला नेहमी विद्यार्थी म्हणून जगायला शिकवते. सतत शिकत राहण्याची कला संगीतामुळे शिकता येते. स्वप्न हे आपल्या ध्येयपूर्तीची पहिली पायरी असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वप्न पहावे. धर्म केवळ शब्द असला, तरी मानवता हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण पूर्ण करून आपल्यातील क्षमता मजबूत करा आणि जगतिक स्तरावरील स्पर्धकांसोबत स्पर्धा करत रहा. जगात कुठेही गेलात तरी भारतीय संस्कृती आणि परंपरेला विसरू नका, असे सामी यांनी सांगितले. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की, संगीत कलेतून देशाची सेवा करता येते. संगीत साधनेतील एक छोटे रोपटे एमआयटीने लावले, आज त्याचा वटवृक्ष झालेला पाहायला मिळत आहे. संगीत सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे मंगेशकर यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here