बुलढाणा : दिवसेंदिवस करोनाची महामारी वाढत चालली आहे. यात जीव धोक्यात घालून नर्सेस कर्तव्य बजावत आहेत. आरोग्यसेवेत काम करणाऱ्या करोना योद्धासाठी तर हा काळ अगदी कसोटीचा आहे. बुलढाण्यातील करोना विरूद्धच्या लढ्यात एक आरोग्य विभागाची हिरकणी लढते आहे. रुग्णांशी कसलाही दुजाभाव न करता कर्तव्य बजावणाऱ्या परिचारिकाच्या या योगदानाला सलाम. तिच्या याच कामाचा बोलता करणारा हा स्पेशल रिपोर्ट.

ज्योती चौधरी या गेल्या १५ वर्षांपासून बुलडाणा इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात वरिष्ट परिचारिका पदावर कार्यरत आहेत. देशभरासह राज्यात करोनाच संकट सुरू आहे. त्यातच बुलडाणा जिल्ह्यात सध्या रुग्णांचा आकडा ७२ हजाराच्यावर पोहचला आहे. यातील अनेक रुग्णांची जबाबदारी या परिचारिकांवर आहे.

कोविड रुग्णालयात सध्या परिचरिका ज्योती चौधरी यांची ड्युटी लावण्यात आली आहे. करोनाच्या रुग्णाला आता ऑक्सिजन, व्हेंटिलेटर हे आवश्यक झालं आहे. याची सगळी काम डोळ्यांत तेल घालून ज्योती करत असतात. यात जराही हलगर्जीपणा झाला तर त्याचा फटका रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो. यासाठी ज्योती यांचा अनुभव महत्त्वाचा ठरतो आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोविड रुग्णालयात करोनाबाधीत रुग्णांची सेवा करत एक करोना फायटर्सचं कर्तव्य पार पाडत असताना रुग्ण जेव्हा रोगातून बरा होतो आणि घरी जातो, तेव्हा त्यांचा चेहरा पाहून खूप आनंद होतो असं ज्योती म्हणाल्या. यावेळी आम्ही करोनाला हरवलं या विचाराने खूप अभिमानास्पद वाटतं असंही ज्योती यांनी सांगितलं. त्यांच्या कर्तव्याला सलाम.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here