एका आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना आरक्षणासाठी निवेदन दिलं. यावेळी उपमुख्यमंत्री आणि अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या मुद्द्यावरही नारायण राणेंनी सरकारला घेरलं. ‘संध्याकाळी ५ वाजता चहाचा वेळ असतो. मुख्यमंत्री चहासाठी राज्यपालांकडे गेले होते. इतरांनाही सोबत चला असं म्हणाले’ अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांना काहीही कळत नाही. ते काही वाचतही नाहीत असाही घणाघात राणेंनी केला. दरम्यान, मराठा समाजाने एकत्र येणं गरजेच आहे. आरक्षणासाठी मराठा समजाने विचार करावा. सरकार आरक्षण देण्यात कमी पडलं आहे. ते सध्या नेतृत्त्व करत असतील तर त्यांनी आरक्षणाची भूमिका मांडावी.
आरक्षणाची जबाबदारी केंद्राची असं सांगून राज्य सरकार जबाबदारी झटकत आहे. घटनेत बसणारं योग्य आरक्षण भाजप सरकारने दिलं. पण या तीन पक्षाच्या सरकारने बाजू मांडली नाही. इतर राज्यांना आरक्षण देणं जमतं मग महाराष्ट्र सरकारला का नाही जमलं? असा थेट सवाल यावेळी नारायण राणे यांची सरकारला विचारला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times