मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ४६ हजार ७८१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९५६ इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली असून असून हा फरक ५ हजार ८२५ इतका आहे. तर आज एकूण ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ७१ हजार ९६६ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख ४६ हजार १२९ वर जाऊन पोहचली आहे. (maharashtra registered 46781 new cases in a day with 58805 patients recovered and 816 deaths today)

आज राज्यात एकूण ८१६ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ७९३ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४६ लाख ०० हजार १९६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.०१ टक्क्यांवर पोहोचले आहे.

पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ४६ हजार १२९ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १ लाख ०३ हजार ६७ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ३६ हजार ५९५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ३१ हजार ३४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४९ हजार ३४५ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार ७८८ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये २६ हजार २५६ इतकी आहे. औरंगाबादमध्ये ९ हजार ३६५, नांदेडमध्ये ही संख्या ५ हजार ०९८ इतकी आहे. जळगावमध्ये ११ हजार ६०१, तसेच तर रायगडमध्ये एकूण ९ हजार २२१ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या १० हजार ९०५, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ८६३ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ८०७ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

३६,१३,००० व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ०१ लाख ९५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख २६ हजार ७१० (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६ लाख १३ हजार व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २९ हजार ४१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here