: कोल्हापूर जिल्ह्यात ( District) वाढती रूग्णसंख्या पाहता शनिवारी मध्यरात्रीपासून ८ दिवस कडकडीत पाळण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह खासदार व आमदार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यात वाढणारी करोना रूग्णसंख्या त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची भासणारी कमतरता पाहता दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

‘जिल्ह्यासाठी रेमडेसिवीरचा कोटा दुप्पट करणार’
या बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत माहिती दिली आहे. ‘अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी तसेच वरिष्ठ सचिवांशी पालकमंत्री आणि मी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत भेटलो आहे. जिल्ह्यासाठी रेमडेसिवीरचा कोटा दुप्पट करत असल्याचे आणि १० मे. टन प्राणवायू पुरवठा केला जाईल, असे सांगितले. बाधितांची संख्या कमी करण्यासाठी साखळी तोडावी लागेल आणि त्यासाठी कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जिल्ह्यात आठ ते दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करावा,’ असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, ब्रेक द चेन करण्यासाठी जिल्ह्यात आता कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. वाढणारी रूग्णसंख्या, व ऑक्सिजनची उपलब्धता पाहता लॉकडाऊन करून कोरोना साखळी तोडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य व्यवस्थेबाबत दिली सविस्तर माहिती
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सविस्तर माहिती दिली आहे. कडक लॉकडाऊन केल्यास कोरोनाची साखळी तुटण्यास १०० टक्के मदत होणार आहे. लॉकडाऊनमुळे रूग्णसंख्या नियंत्रीत राहील. त्यामुळे सुविधा पुरविण्यास ताण येणार नाही. ग्रामसमिती, वॉर्डसमिती पुन्हा सक्रिय केल्या आहेत. त्याचाही पुन्हा प्रभाव पहायला मिळेल. बेड व्यवस्थापनाच्या माहितीसाठी डॅशबोर्ड तसेच वॉररूम सक्रिय आहे. ४०० जम्बो सिलेंडरचा पीएसए प्लॅंट बसवून आयजीएम आणि सीपीआर स्वयंपूर्ण करत आहोत. जिल्ह्यातील अतिरिक्त १७०० ते १८०० जम्बो सिलेंडरची क्षमता नवीन ऑक्सिजन निर्मितीने पोहोचणार आहे. हे ऑक्सिजन प्लँट जनरेटर कॉम्प्रेसरवर चालणार आहेत, असं जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here