जिल्ह्यातील टायो निप्पॅान आणि तळोजा येथील लिंडे या कंपन्यांतील तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेली निर्मिती पुन्हा सुरू झाली असून, प्रत्यक्ष ऑक्सिजन पुरवठ्याला सुरुवात करण्यात आली आहे. टायो निप्पॉन कंपनीकडून १४ टन, तर लिंडे कंपनीतून १५ टन बुधवारी करण्यात आला. (the possible in has been eliminated)
पुणे जिल्ह्यातील टायो निप्पॅान या कंपनीकडून दररोज सुमारे ३० टन ऑक्सिजनचा पुरवठा होतो. या कंपनीतील उत्पादन मंगळवारी बंद पडले होते. लिंडे कंपनीच्या तळोजा आणि मुरबाड येथील प्रकल्पांतून १२० टन ऑक्सिजन मिळत असते. त्यापैकी तळोजा येथील प्रकल्पातील ऑक्सिजन निर्मिती बंद पडली होती. या दोन्ही कंपन्यांमधील ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात झाली आहे. ऑक्सिजन पुरवठाही सुरू झाला आहे. टायो निप्पॉन कंपनीतून १४ टन आणि लिंडे कंपनीतून १५ टन ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-
या दोन्ही कंपन्यांमधील ऑक्सिजन निर्मिती बंद पडल्यामुळे पुण्यात निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, फ्रान्स सरकारने दिलेल्या ४० टन ऑक्सिजनपैकी ३० टन आणि ओडिशा येथून रेल्वेने ५८ टन ऑक्सिजन जिल्हा प्रशासनाने तातडीने उपलब्ध केल्याने पुण्यावरील ऑक्सिजन तुटवड्याचे संकट टळले.
क्लिक करा आणि वाचा-
ओडिशातील अनगुल तेथून रेल्वेने चार टँकर मागविण्यात आले. रेल्वेने नागपूर मार्गे मंगळवारी मध्यरात्री लोणी येथे ऑक्सिजनचा साठा आला. त्यानंतर मागणीनुसार या ऑक्सिजनचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times