मुंबई: राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी ५ वर्षांवरून २ वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे विशेष आभार मानले. ( )

वाचा:

राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आदित्य ठाकरे पाठपुरावा करत होते. त्यांच्या विनंतीवरून या अनुषंगाने एक समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे एसआरपीएफ जवानांचे मनोबल उंचावणार असून अधिक कार्यक्षमतेने कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या निर्णयाबद्दल मंत्री आदित्य ठाकरे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक , अतिरिक्त पोलीस महासंचालक यांचेही आभार मानले आहेत.

वाचा:

पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठवणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-२०१८ आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा २०१७ मधील पात्र एकूण ७३७ उमेदवारांना जून-२०२१ पासून नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रशिक्षण कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या करोना मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून सुरू करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here