ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी अनुपम खेर यांनी केंद्र सरकारला टीकेचं लक्ष्य केलं. ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात काही घडतंय, त्यावरून आता सरकारला जबाबदार ठरवणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांवर जाहीरपणे टीका अनेक प्रकरणांमध्ये वैध आहे’, असं अनुपम खेर म्हणाले.
‘सरकारने आव्हानांचा सामना करावा
‘
सरकारचा प्रयत्न हा जनतेला दिलासा देण्याऐवजी स्वतःची प्रतीमा बनवण्यावर आहे, असा प्रश्न खेर यांना विचारला गेला. ‘सरकारने आव्हानांचा सामना करावा आणि ज्यांनी निवडून दिलं आहे, त्यांच्यासाठी काम करावं’, असं खेर म्हणाले.
‘नदी वाहत असलेल्या मृतदेहांवरून राग आला पाहिजे’
गंगा, यमुनेसह इतर नद्यांमध्ये वाहत असलेले अज्ञात मृतदेहांचा उल्लेख यावेळी अनुपम खेर यांनी केला. ‘अनेक प्रकरणांमध्ये सरकारवर टीका करण गरजेचं आहे. एखादा क्रूर व्यक्तीच अशा प्रकारे नद्यांमध्ये वाहत असलेल्या मृतदेहांना पाहून विचलीत होणार नाही. आपण संताप व्यक्त केला पाहिजे. जे काही होतंय, त्याला सरकारला जबाबदार ठरवणं गरजेचं’, असं अनुपम खेर यांनी म्हटलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times